सत्ताधीशांपुढे संयतपणे पण धैर्यशीलतेने सत्य मांडणारी पत्रकारिताच लोकशाहीसाठी महत्त्वाची असते!
२०१९च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी रवीश कुमार यांची निवड करताना, त्यांच्या या सर्वोच्च प्रतीच्या व्यावसायिक निष्ठेला, नैतिक मूल्यनिष्ठेला, सत्याच्या बाजूने उभे राहण्याच्या त्यांच्या नैतिक धैर्याला, नीतीनिष्ठा आणि स्वतंत्र वृत्तीला याशिवाय मूक अशा अन्यायग्रस्तांना एक स्पष्ट आणि आदरयुक्त आवाज देणे महत्त्वाचे आहे. या त्यांच्या विश्वासालाच विश्वस्त मंडळाने पुरस्काररूपे मान्यता दिली आहे.......